Indian Army TES Recruitment 2023 : इंडियन आर्मी पर्मनंट कमिशन अंतर्गत टेकनिकल एन्ट्री स्कीम (TES 51) द्वारे एकूण 90 जागांसाठी भरती जाहीर केली आहे. ही भरती 10+2 उत्तीर्ण (PCM) उमेदवारांसाठी आहे, ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 12 नोव्हेंबर 2023 आहे. या भरतीसाठी पात्रता व अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
उमेदवारांना joinindianarmy.nic.in या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावे लागतील. अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 नोव्हेंबर 2023 आहे.
पात्रता – Eligibility Criteria
- उमेदवार भारतीय नागरिक असावा.
- उमेदवाराचा जन्म 02 जुलै 2004 ते 01 जुलै 2007 च्या दरम्यान झालेला असावा.
- उमेदवाराने 10+2 परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा (Physics , Chemistry आणि Mathematics) घेऊन JEE Mains दिली असावी.
- उमेदवाराने शालेय शिक्षणात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांमध्ये एकूण 60% गुण मिळवले असावेत.
निवड झालेल्या उमेदवारांची ४ वर्ष ट्रैनिंग दिली जाईल व त्यांना इंजिनीरींग डिग्री सुद्धा दिली जाईल.
वेतनमान / Salary : 56,100/- रुपये ते 2,50,000/- रुपये
निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे असेल:
- ऑनलाइन परीक्षा: 12th आणि JEE स्कोर वरून पात्र उमेदवारांना SSB Interview साठी बोलवण्यात येईल.
- फिजिकल टेस्ट: उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना शारीरिक चाचणी द्यावी लागेल. यामध्ये उंची, वजन, धावणे, पोहणे आणि इतर चाचण्यांचा समावेश असेल.
- मेडिकल टेस्ट: शारीरिक चाचणी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना वैद्यकीय चाचणी द्यावी लागेल.
अर्ज कसा करावा :
- joinindianarmy.nic.in या वेबसाइटला भेट द्या.
- “Apply Online” टॅबवर क्लिक करा.
- “TES 51” भरतीसाठी अर्ज करण्यासाठी “Apply” बटणावर क्लिक करा.
- आवश्यक माहिती भरा आणि अर्ज सबमिट करा.
जाहिरात Indian Army TES Recruitment | डाउनलोड करा |
ऑनलाईन अर्ज करा | येथे क्लिक करा |